बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटसेनेची चिंता वाढली! पाकिस्तानच्या ‘या’ दोन खेळाडूंनी सामन्याआधी दाखवला ट्रेलर

मुंबई | क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध भारत आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात करणार आहे. भारताने सोमवारी सराव सामन्यात 7 गडी राखून इंग्लंडवर विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघांचं आत्मबल आता वाढलेलं दिसत आहे. मात्र वेस्ट इंडिज विरूद्ध पाकिस्तान संघाने सराव सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताची चिंता वाढली आहे.

इंग्लंडने दिलेलं 188 धावांचं लक्ष्य भारतीय संघाने 6 चेंडू आणि 7 गडी राखून पूर्ण केलं. यावेळी भारताच्या सलामीवीरांनी तुफान फटकेबाजी केली.  यामध्ये के.एल. राहुलची अर्धशतकी पारी आणि ईशान किशनने 70 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचबरोबर सरतेशेवटी रिषभ पंतने मारलेला विजयी षटकार भारतच विश्वचषक 2021 चा दावेदार असल्याचं दाखवून दिलं. मात्र तिकडे पाकिस्तानच्या दोन फलंदाजांनी केलेल्या खेळीने भारताविरूद्ध जिंकण्याच्या पाकिस्तानच्याही आशा वाढल्या आहे.

वेस्ट इंडिज विरूद्ध सराव सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने अर्धशतकी खेेळी साकारली. त्याचबरोबर फखर जमानने 24 चेंडूत 50 धावांची जलद खेळी केली. या खेळीत 4 चौकार तर 2 उत्तुंग षटकार ठोकले. पाकिस्तानने हा सामना 7 गडी राखून आपल्या खिशात घातला. 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्येही भारताविरूद्ध फखर जमानने शतक ठोकले होते. त्यामुळे या दोन खेळाडूंची चिंता भारताला आता सतावत आहे.

दरम्यान, विश्वचषक सामन्यांना धमाकेदार सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघदेखील भारताच्या गटात खेळणार आहेत. विश्वचषक 2021चा प्रमुख दावेदार भारतच मानला जात आहे. परंतु भारतापूढे विश्वचषकमधील सामान्यांमध्ये कशा पद्धतीचा खेळ करणार आहे. ते आता पाहाव लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय, काळजी करू नका मी दिलेला शब्द पाळतो”

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात तू-तू-मै-मै, सभागृहाचं वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

“राहुल गांधींना ड्रॅग्जचं व्यसन, ते ड्रॅग्ज तस्करी देखील करतात”

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More