Virender Sehwag | आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. (IPL 2024) नेहमीप्रमाणे यंदा देखील प्रेक्षकांनी मैदानं खचाखच भरत आहे. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूची झलक पाहण्यासाठी आणि आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. आतापर्यंत झालेली सहा सामने प्रेक्षणीय झाले. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतींनी प्रेक्षकांना सामन्यात जिवंत ठेवण्याचे काम केले. पण, रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात झालेला सामना बहुचर्चित ठरला.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळत असलेल्या गुजरात टायटन्सने शानदार विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने नेहमीप्रमाणे आपला सलामीचा सामना गमावला. खरं तर मुंबई प्रथमच हार्दिक पांड्याच्या तर गुजरात शुभमनच्या नेतृत्वात खेळत आहे.
सेहवाग संतापला!
गुजरातचा माजी कर्णधार मुंबईचा विद्यमान कर्णधार झाला आहे. हार्दिकची घरवापसी झाल्याने रोहित शर्माला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. रोहितला कर्णधारपदावरून काढल्यामुळे चाहत्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे, ज्याचा प्रत्यय मुंबई आणि गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यात आला. हार्दिकसमोर अतिउत्साही आणि संतापलेल्या चाहत्यांनी ‘रोहित रोहित’ अशा घोषणा दिल्या.
खरं तर हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी आला तेव्हा देखील त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. हार्दिक ड्रेसिंग रूममकडे जात असताना प्रेक्षकांनी त्याच्याबद्दल अपशब्द वापरले. मैदानात कुत्र्याची एन्ट्री होताच प्रेक्षकांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्या. यावरून भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग चांगलाच संतापला. त्याने हार्दिकला ट्रोल करणाऱ्या चांहत्यांना चांगलेच सुनावले.
View this post on Instagram
Virender Sehwag कडून पाठराखण
वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, हार्दिक पांड्याला ज्याप्रकारे ट्रोल केले जात आहे ते पाहून मी खूप निराश आहे. मला वाटते की, कोणत्याही खेळाडूला बदमान केले जाऊ नये. भारतीय खेळाडू असो की मग परदेशी… प्रत्येकाचा सन्मान करायला हवा. प्रेक्षक सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात, त्यांनी अशा प्रकारे घोषणा देऊन हार्दिकवर टीका करणे चुकीचे आहे. अशा टीकेमुळे काय फरक पडतो?
तसेच जर हार्दिक मुंबईच्या संघात आला असेल तर त्यात चुकीचे काय आहे? तो देखील आपल्या राष्ट्रीय संघाचा एक खेळाडू आहे. त्याचाही इतर खेळाडूंप्रमाणे आदर करायला पाहिजे. मी समजू शकतो चाहत्यांना राग आला आहे, पांड्याबद्दल रोषाचे वातावरण आहे. पण ते वेगळ्या पद्धतीने दाखवा, कोणीही अशाप्रकारे कोणाचा अपमान करू शकत नाही, अशा शब्दांत वीरूने हार्दिकच्या टीकाकारांना सुनावले.
News Title- IPL 2024 Former Indian Player Virender Sehwag speak on Mumbai Indians captain hardik pandya criticism
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् शुभमन गिलला मागावी लागली माफी; टॉसदरम्यान नेमकं काय घडलं?
लग्नाच्या चर्चेदरम्यानच तापसीचा ‘तो’ फोटो समोर; चाहते संभ्रमात
“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत
बारामतीत उमेदवार बदलणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
बच्चन कुटुंबाच्या फॅमिलीफोटोत ऐश्वर्या राय गायब; अखेर सत्य आलं समोर