बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”

नवी दिल्ली | भारताचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत मिळालेली संधी कधीच सोडत नाही. भारताकडून जेव्हा जेव्हा खेळायला मिळेल तेव्हा तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे फक्त भारताचेच नाही तर विदेशी खेळाडूही रिषभची प्रसंशा करत आहेत. भारताचा माजी आघाडीचा आक्रमक फलंदाज विरेंद्र सेहवागने रिषभचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत सर्वात सकारात्मक कोणती गोष्ट असेल तर ती रिषभ पंत आहे. कारण एकदिवसीय सामन्यात जेव्हा रिषभ खेळायला येतो तेव्हा पाॅवर प्ले चालू असतो. या वेळी धावा करणं संघासाठी महत्वाचं असतं. रिषभ या पाॅवर प्लेचा पुर्ण उपयोग करतो. त्यामुळे त्याला भारतीय संघात कायम राखणं महत्वाचं आहे. त्याची मानसिकता खूप सकारात्मक आहे. तो दुसरे काय विचार करून खेळतात, याचा विचार करत नाही. त्यामुळे तो चांगली फलंदाजी करू शकतो, असं विरेंद्र सेहवाग म्हणाला आहे.

रिषभची सुरूवात चांगली झाली की, तो मोठी धावसंख्या उभी करू शकतो. भारताचा पुढचा स्टार म्हणून तो पुढे येत आहे. त्याची खेळी बघून मला माझे सुरवातीचे दिवस आठवतात. कितीही खराब खेळपट्टी असली तरी तो त्याच्या अंदाजाप्रमाणे खेळतो. त्यामुळे तो एक स्पेशल खेळाडू आहे, असं सेहवाग म्हणाला.

दरम्यान, रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो धोनी आणि एडम गिलख्रिस्त दोघांनाही मागे टाकेल, असा विश्वास पाकिस्तानचा खेळाडू इंजमाम उल हक याने दाखवला होता. रिषभची आक्रमक खेळी बघता त्याची आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण

वाढत्या कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय!

पुण्यातील हृदयद्रावक घटना, कार धरणात कोसळल्याने आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

…तर अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत- अजित पवार

“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More