भारत विरूद्ध न्यूझीलंड सामन्याआधी सेहवागनं धोनीला हा सल्ला दिला

मुंबई | भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्या तिसऱ्या सामन्याआधी भारताचा माजी धडाकेबाज म्हणून ओळखला जाणारा विरेंद्र सेहवागनंं धोनीला एक सल्ला दिलाय. 

धोनीनं टीम मधील आपली भूमिका ओळखली पाहिजे, मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना त्यानं लवकर रन बनवावे लागतील, निवड समितीने त्याला याबाबत सांगितलं पाहिजे, असंही सेहवागनं सांगितलं.

विराट कोहलीच्या नेतृत्तात खेळणाऱ्या टीम इंडियाला धोनीची आवश्यकता आहे. योग्य वेळ आल्यावर तो निवृत्त होईल, कोणत्याही युवा खेळाडूचा रस्ता तो रोखणार नाही, असंही त्यानं सांगितलं