बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला मुंबई इंडियन्सला पराभूत होताना पाहायचंय, चॅम्पियन होताना नाही”

मुंबई | यंदाच्या मोसमातील मुंबई इंडिअन्सची कामगिरी सुमार राहिली आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणारा संघ मुंबई प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मुंबईचे गोलंदाज आणि फलंदाज दोन्हींची कामगिरी अव्वल दर्जाची होत नसल्यामुळे संघाला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबईने गुणतालिकेमध्ये पहिल्या नंबरचं स्थान गाठावं असं मला वाटत नाही. नवीन संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरला पाहिजे. जेणेकरून चाहत्यांना एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळावा, तो संघ सध्या मुंबई, बंगळूरू किंवा पंजाब असेल, असं विरेंद्र सेहवाग म्हणाला.

मुंबई संघासाठी करा किंवा मरा अशी स्थिती असणार आहेत. जर आपण या संघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सर्वांना वाटेल की, हा संघ इतिहासाची पुनरावृत्ती करु शकेल. पण माझा इतिहासावर जास्त विश्वास नसल्याचं सेहवागने म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईचा आजच्या सामन्यात म्हणजे दिल्लीविरूद्ध पराभव झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत.  मुंबई इंडिअन्स आणि  दिल्ली कॅपिटल्समधील रोेमांचक सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. अखेरपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये आर. आश्विनने षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

थोडक्यात बातम्या- 

पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला ‘त्या’ निर्णयावरून घरचा आहेर; म्हणाले…

श्रेयस अय्यर दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’! अखेरपर्यंत एकटयाने खिंड लढवत मुंबईवर केली मात

“‘त्यांच्यामुळे’ मी राजकारणात स्थिर झालो, माझा आणि राजकारणाचा दूरदूरचा संबंध नव्हता”

गांधी जयंतीदिवशी सोशल मीडियावर धार्मिक कट्टरतावाद्यांकडून नथूराम गोडसे जिंदाबादचा नारा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More