नवी दिल्ली | कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या मुलीने भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. विद्याराणीने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी विविध पक्षांच्या जवळजवळ हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तामिळनाडूतील भाजप नेते मुरलीधर राव आणि पोन राधाकृष्णन यांच्यासह भाजप नेत्यांच्या उपस्थितीत विद्याराणीने भाजपप्रवेश केला. पंतप्रधान नरेंद मोदी हे माझ्या प्रेरणास्थानी आहेत. त्यांच्या प्रेरणेनं मी भाजपमध्ये प्रवेश केला, असं विद्याराणी म्हणाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. जाती-पातीचा विचार न करता गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मदत करण्याची माझी इच्छा असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. विद्याराणी तामिळनाडूतील कृष्णगिरीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना शिकवतात.
ऐंशीच्या दशकात वीरप्पनची तामिळनाडूमध्ये दहशत होती. अपहरण, हत्तींची शिकार आणि चंदन तस्करीसाठी तो कुख्यात होता. 2004 साली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विरप्पनचा मृत्यू झाला.
ट्रेंडिंग बातम्या-
आदिती तटकरेंवर मुख्यमंत्र्यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी
ठाकरे सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
महत्वाच्या बातम्या-
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच विरोधक आक्रमक; पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी
‘नमस्ते ट्रम्प’ हा देशातील ऐतिहासिक सोहळा असेल- नरेंद्र मोदी
Comments are closed.