बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जबाबदार नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचार महत्वाचा”

ठाणे | विद्यार्थी हे कोणत्याही देशाचा आणि राज्याचा अभिमान असतात. विद्यार्थी घडवण्याचं कार्य शाळा आणि महाविद्यालयात चांगल्या पद्धतीने केलं जातं. 21 व्या शतकात तंत्रज्ञानाच्या मदतीने आपली शिक्षण व्यवस्था काम करत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थी घडवण्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

विद्यार्थ्यांवर संस्कार  रूजवण्याचा काळ हा त्यांच्या बालपणाचा असतो. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा शिकवून चांगले शिक्षण द्यावं असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत. चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून जबाबदार नागरिक तयार करण्यावर भर दिला जावा. ज्यामुळे देशाला विद्यार्थ्यांचा फायदा होईल, असंही भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील विद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. विद्या प्रसारक मंडळाच्या विधी शाखेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा यावेळी पार पडला. विद्या प्रसारक मंडळ हे दुर्गम भागात शिक्षण देण्यासाठी ओळखलं जाते. विविध विभागाच्या माध्यमातून या भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर विद्या प्रसारक मंडळाचा भर आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी महिलांच्या सहभागावर सुद्धा भाष्य केलं आहे. समाज घडवण्यासाठी शिक्षण प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. सामाजिक कार्यात विद्या प्रतिष्ठाणने महिलांचा सहभाग वाढवावा, अशी सूचना राज्यपाल यांनी आपल्या भाषणातून आयोजकांना केली आहे.

थोडक्यात बातम्या 

‘नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत …’; अमरिंदर सिंग यांनी केले गंभीर आरोप

‘राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसतील तर…’; शशी थरूर यांचं मोठं वक्तव्य!

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ‘हे’ पाच महारथी आघाडीवर, जाणून घ्या!

पुणे कोरोना अपडेट, वाचा आजची आकडेवारी!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More