बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधितांसाठी विरुष्काचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत

मुंबई | कोरोनाचा विळखा राज्यातच नव्हे तर देशभर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अनेकांनी आता पुढे येत आपापल्या परीने मदत करायला सुरूवात केली आहे. यात कलाकार तसेच खेळाडूंचाही समावेश आहे.

कोरोनाची भीषण परिस्थिती पाहून काही सेलेब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आता या यादीमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे देखील सामील झाले आहेत.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने भारतातल्या कोव्हिड मदतकार्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे. यातील दोन कोटी रुपयांचा निधी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली स्वतः देणार आहेत. केट्टो डॉट ओआरजी (ketto.org) या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवरून#InThisTogether या नावाने हा निधीउभारण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे.

आतापर्यंत विराट-अनुष्काच्या दोन कोटींव्यतिरिक्त 42 लाखांहून अधिक रक्कम काही तासांत जमा झाली आहे. या उपक्रमातून जमा झालेला निधी ACT Grants या संस्थेकडे दिला जाणार आहे. ही संस्था ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्धता, लसीकरण जनजागृती, टेलिमेडिसीन फॅसिलिटीज आदी प्रकारचं कार्य करत आहे.

थोडक्यात बातम्या- 

संकटं आल्यामुळेच मी घडले- सिंधूताई सपकाळ

‘मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच मन की बातची टेप लावली’; मुख्यमंत्र्यांची मोदींवर टीका

पुण्यातील ‘त्या’ पोलिसाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, बुधवार पेठ कनेक्शन?

आता काही सेकंदात कळणार कोरोना चाचणीचा निकाल; मुकेश अंबानी बोलवणार इस्राईलची विशेष टीम

“सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय भाष्य करू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More