बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

GDP असा घसरत आहे जसा भाजपचा नैतिक स्तर- विशाल दादलानी

मुंबई | बाॅलिवूड गायक आणि कंम्पोजर विशाल दादलानीने अनेकदा भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. त्याने ट्वीट करत पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दादलानीने भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं असून ‘ECONOMY त्रस्त, मोदी मस्त’ असं म्हटलं आहे.

लोकांकडे रोजगार नाही, सारे उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. देशात जीडीपी असा कमी होत आहे जसा भाजपचा नैतिक स्तर, आणि सियाचिनमध्ये देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत, असं म्हणत दादलानीने टीका केली आहे..

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 8588 कोटी रुपयांचे बोईंग विमाने खरेदी केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दादलानीने ही टीका केली आहे.

दरम्यान, विशाल दादलानीचे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहींनी त्याच्यावर टीकास्त्र सोडले आहे तर काहींनी त्याचे समर्थन केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

हे हिंदुराष्ट्र मी मानणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र

“शरद पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलवू नका”

महत्वाच्या बातम्या-

मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवू नये- अमेय खोपकर

मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाय; राऊतांचा मोदींना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More