“वसंत दादांचा नातू निवडून आलाय, त्यामुळे ठाकरेंची..”; विशाल पाटलांचं वक्तव्य चर्चेत

Vishal Patil | सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. सांगलीत महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा स्थानिक कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले गेले. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता.

महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगली ही जागा सर्वाधिक वादाची ठरली होती. शिवसेना ठाकरे गटाने परस्पर या जागेवर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यानंतर प्रचंड वाद झाला होता. याचा शिवसेनेला चांगलाच फटका बसला. तर, विजयी झाल्यानंतर विशाल पाटोल यांनी पुन्हा कॉँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

विशाल पाटील यांचा कॉँग्रेसला पाठिंबा

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व बुधवारी स्वीकारले. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यामुळे ते जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.यावर आता स्वतः विशाल पाटील (Vishal Patil) आणि डॉ. विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सांगलीत काँग्रेसकडून ही जागा सुटली गेली. परंतु, जनतेने ही निवडणूक हातात घेतली. जनतेने अपक्ष खासदार निवडून दिला. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीचा हेतू होता की भाजपाला हरवणं, निवडून आलेला खासदार महाविकास आघाडी बरोबर आहे. आम्ही काँग्रेसला समर्थन दिलं आहे.”, असं डॉ. विश्वजित कदम म्हणाले आहेत.

सांगलीत विशाल पाटील अपक्ष खासदार निवडून आले

पुढे उद्धव ठाकरेंच्या नाराजीवर विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादा पाटील यांचे चांगले संबंध होते. वसंत दादांचा नातू निवडून आला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना आनंद झाला असेल. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याची गरज वाटत नाही. आता जे झालं ते झालं, असं संजय राऊतही म्हणालेत.”, असं विशाल पाटील (Vishal Patil) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विशाल पाटील यांच्या कॉंग्रेसला पाठिंबा देऊन सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याने कॉंग्रेसचे राज्यातील संख्याबळ 14 तर देशात 100 झाले आहे. विजयानंतर विशाल पाटील यांनी दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती.

News Title- Vishal Patil Statement After Supporting Congress

महत्वाच्या बातम्या-

सरकार स्थापनेपूर्वीच सराफा बाजारात तेजी; सोनं महागलं, आता किंमती काय?

“सुजल्यावरच कळतंय..”; शरद पवार गटाने बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं

सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका! व्याज दरात केली ‘तब्ब्ल’ एवढ्या टक्क्यांची वाढ

ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप?, शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती