पुणे महाराष्ट्र

‘आयुक्त साहेब जरा याचंही उत्तर द्या’; विशाल तांबेंचं आयुक्तांना पत्र

पुणे | आर्थिक संकटाच्या काळात महापालिकेस मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देताना, प्रशासनाची दमछाक होत आहे. असं असताना पीपीपी तत्वावर शहरातील एकाच भागातील 12 रस्ते आणि 2 उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाचा अट्टाहास का?, असा प्रश्‍न स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपस्थित केला आहे.

ज्या प्रकारे हा प्रस्ताव मांडण्यात आणि मंजूर करण्यात आला ही बाब संशयास्पद असून या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी समोर येऊन पुणेकरांना उत्तरे द्यावीत, अशी मागणी तांबे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

या प्रस्तावात नमूद केलेले दोन्हीही पूल खासगी विकसकांनी त्यांच्या खर्चाद्वारे विकसित करण्याची तयारी पीएमआरडीएला दाखविली होती. तसा पत्रव्यवहार झाल्याचं समजतं. अशा परिस्थितीत आपण हे पूल करण्यासाठी आग्रही का आहेत?, असा सवाल तांबेंनी केलाय.

एका ठराविक भागांमध्ये सुमारे सहाशे कोटी रुपये जर महानगरपालिका खर्च करणार असेल तर इतर भागातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नांकरता स्वाभाविकपणे उत्तर देणं ही आपली जबाबदारी असल्याने या उपस्थित प्रश्‍नांचा आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी तांबे यांनी पत्रात केली आहे.

थोडक्यात बातम्या-

लॉजवर पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागला; तरुणाचा जागीच मृत्यू!

“सरकारी ट्विटर हॅंडलवर सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?”

“भाजपचे सत्ताधिकारी पदाधिकारी तेव्हा झोपले होते का?”

आयुक्तांनी उचलला पोलिसांना फिट ठेवण्याचा विडा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट ‘या’ दिवसापर्यंत बंद राहणार- झुकरबर्ग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या