नराधमाने तब्बल 66 जणींवर केला बलात्कार, अशा पद्धतीने महिलांना ओढायचा आपल्या जाळ्यात!
नवी दिल्ली | देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बलात्कार, विनयभंगांच्या घटना आपण रोज ऐकत असतो मात्र या नराधमांना कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशताच अशाच एका नराधमाने तब्बल 66 महिलांवर बलात्कार केल्याची माहिती समजत आहे. याबाबत एका पीडितेने आपल्या वेदना मांडल्या आहेत.
विशाल वर्मा असं या तरूणाचं नाव असून पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात एका कंपनीचा केक डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. हा नराधम फीडबॅकच्या नावावर महिलांना ब्लॅकमेल करायचा. पीडितेने सांगितल्यानुसार, या महिन्यामध्यो तो 18 तारखेला आरोपीने व्हाट्सअॅपच्या माध्यमातून अश्लिल मेसेज पाठवायला सुरूवात केली. माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाहीतर व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली.
आरोपी जेव्हा फीडबॅकसाठी व्हिडीओ कॉल करायचा तेव्हा आपल्या फोनमध्ये तो काही फोटो घ्यायचा. इतकच नाही तर तो महिलांकडे दागिन्यांची मागणी करायचा नाहीतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचं पीडितेने सांगितलं.
दरम्यान, विशाल वर्मा आणि त्याचा मित्र सुमन मंडल यानेही पीडितेचं शोषन केलं असल्याचं पीडिता म्हणाली. त्यासोबतच या नराधमांनी पीडितेवर बलात्कार करण्याचादेखील प्रयत्न केला होता. पोलिसांनी विशाल आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांना रिमांडमध्ये घेतलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणाचं पुर्ण रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार देण्याची हिम्मत दाखवणाऱ्या स्वरदा बापट कोण?, जाणून घ्या
“कोरोनाची लस भारतात कधी उपलब्ध होईल, मला कोणी सांगू शकेल का?”
पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांना हवं ते मिळालं, आता कारवाई होणार?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली कार, पाहा व्हिडीओ!
Comments are closed.