मुंबई | माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात विष्णू सावरा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंतयात्रा उद्या दुपारी 1 वाजता वाडा येथील निवासस्थानातून निघणार आहे.
विष्णू सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. विष्णू सावरा सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
दरम्यान, सावरा यांचं पालघर भागात कार्यक्षेत्र होतं. विष्णू सावरा यांनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.
थोडक्यात बातम्या-
“भाजपने कुठलीही पालिका निवडणूक लढवावी, त्यांचा पराभव निश्चित”
‘ग्लोबल टीचर’ रणजीत डिसले यांना कोरोनाची लागण!
‘कृषी कायदा रद्द करा’; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी
शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला आहे- राहुल गांधी