महाराष्ट्र मुंबई

‘शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत’; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

मुंबई | माजी खासदार संजय निरूपम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या एका वर्षात काँग्रेस पक्ष सरकारमध्ये एक सहयोगी पक्ष म्हणूनच राहिला आहे. महाराष्ट्रात सरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप विश्वबंधू राय यांनी केला आहे.

आपली मतं आपले सहकारी पक्ष आणि विरोधी पक्षा त्यांच्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहेत. पक्षातून अन्य पक्षात होणारे प्रवेश थांबवण्यासाठीही काही पावलं उचलणं आवश्यक आहे, असंही विश्वबंधू राय म्हणालेत.

रकारमधील काँग्रेस पक्षातील अनेक मंत्री संघटनेच्या कोणत्याही कामासाठी मदतीस येत नाही. सामान्य जनता आणि पक्षा कार्यकर्त्यांना मंत्र्यांच्या विभागाबद्दलही माहिती नाही. महाराष्ट्रात सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी राज्यातील अनेक विभाग, मंडळं आणि आयोगांवरील पद रिक्त आहेत. त्यावर आतापर्यंत नियुक्ती करण्यात आलेली नाही, असं विश्वबंधू राय यांनी पत्रात नमूद केलंय.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं; रानगव्यांनंतर दिसला हरणांचा कळप!

‘पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…’; संजय राऊत आक्रमक

राहुल गांधी गर्भश्रीमंत, मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय- राजनाथ सिंह

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्येची सुपारी; पुण्यात खळबळ

‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या