मुंबई | काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव त्यांना चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसंच आहे… सांगलीचे काँग्रेस विचारांचे दोन नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचं कळतंय.
ज्यांच्या वडिलांनी संपूर्ण जीवन काँग्रेसमध्ये घालवलं त्या दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम आणि सांगलीच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ असलेले काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त ‘टीव्ही 9’ मराठी या वृत्तवाहिनेने दिलं आहे.
विश्वजित कदम यांना याअगोदरही भाजपाने खुली ऑफर दिली होती. मात्र त्यांनी त्यावेळी भाजपात जाण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका मांडली होती.
दरम्यान, या वृत्ताने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-काँग्रेस पक्षाशी आता माझा काहीही संबंध नाही- राधाकृष्ण विखे पाटील
-निवडणूक लढायला हिम्मत लागते; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
-खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांची बाईक राईड; कार्यकर्त्यांनी केला व्हीडिओ व्हायरल
-सर्व आरोप प्रत्यारोप विसरून ममता दिदी जाणार मोदींच्या शपथविधी
-आगामी विधानसभेसाठी मनसेला सोबत घ्या; आघाडीच्या बैठकीत सूर
Comments are closed.