Top News महाराष्ट्र मुंबई

“शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत आहे”

मुंबई | भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारमध्ये खटके उडत असल्याचं दिसत आहे. अशातच मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी पक्षाच्या हायकमांड यांना पत्र लिहिलेल्या पत्रामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत असल्याचं विश्वबंधू राय यांनी पत्रात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे काँग्रेस आणि जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये कायम राहण्याचे कुठलेही औचित्य दिसत नाही. ही आघाडी काँग्रेससाठी नुकसानकारक दिसत असल्याचंही राय यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मित्रपक्षांच्या चुकांचा फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि त्याच्या कार्यकर्त्यांचे भविष्य पाहून पक्षश्रेष्ठींनी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचंही पत्रात नमूद केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार’; भाजप खासदाराचा सरकारला इशारा

“ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार”

आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही- रावसाहेब दानवे

‘इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे तर….’; शरद पवारांची गुगली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या