Top News महाराष्ट्र सांगली

मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

सांगली |  मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. (Vishwajeet kadam Family 3 people tested Corona Positive) विश्वजीत कदम यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

घरातल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं आहे. (Vishwajeet kadam Family 3 people tested Corona Positive) बंधू, वहिनी आणि पुतण्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, असं सांगत माझी प्रकृती ठणठणीत असल्याचं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

माझा पुतण्या डॉ. जितेश कदम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू एच. एम. कदम आणि वहिनी यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आहे. (Vishwajeet kadam Family 3 people tested Corona Positive) त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाचा मुकाबला करीत डॉ. जितेश हे पलूस-कडेगावसह सांगली-मिरज भागांमध्ये अहोरात्र सेवाकार्य करीत होते, असं विश्वजीत यांनी सांगितलं.

क्वारन्टाईन भागांमधील नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेपासून सॅनिटायझर,अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटप अशा अनेक आघाड्यांवर घरातल्या व्यक्ती सर्वसामान्य जनतेला मदत करीत होते. त्यांची तब्येत ठीक असून मी स्वतः उपचारांवर जातीने लक्ष देत आहे. डॉ. जितेश हे लढवय्ये असून कोरोना संसर्गावर मात करून ते पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत होतील, असा मला विश्वास आहे, असं विश्वजीत म्हणाले. (Vishwajeet kadam Family 3 people tested Corona Positive)

 

माझा पुतण्या डॉ. जितेश कदम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू एच. एम. कदम आणि वहिनी यांचाही…

Posted by Vishwajeet Kadam on Monday, August 10, 2020

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘ऑपरेशन लोटस’ इथे शक्य नाही’, संकट काळात सोडून गेले नाही ते आता कसे जातील?- नवाब मलिक

माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास तहसिलदारांचे पतीच जबाबदार- दिलीप मोहिते पाटील

भारतीय हॉकी संघातील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाला पार्थ पवार यांच्या शुभेच्छा, म्हणाले…

पार्थ पवारांच्या राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या