बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अन्यायकारक कायद्याची सर्वाधिक झळ महाराष्ट्राला; राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव”

मुंबई | महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज्याच्या कृषी सुधारणा विधेयकावर चर्चा केली. यानंतर बाळासाहेब थोरातांनी महत्वाची घोषणा केली होती. त्यानंतर आता विश्वजीत कदम यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.

नागरी सहकारी बँकांशी आम्ही बोलत आहोत. केंद्र सरकारने केलेल्या अन्यायकारक कायद्याची झळ सर्वात जास्त महाराष्ट्राला बसणार आहे. राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असं कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले आहेत. कृषी कायदे, सहकारी बँक, आणि पीक विमा या विषयांवर शरद पवारांशी चर्चा झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली होती.

दरम्यान, ठाकरे सरकार नवीन कृषी विषयक कायदे आणण्याच्या तयारीत आहे. दिल्लीच्या सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता सर्व सरकारने कृषी कायद्याविषयी सावधगिरीने पावलं उचलत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने बुधवारी खरीप पिकांवरची MSP वाढवली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आता आनंद दिसू लागला आहे.

थोडक्यात बातम्या-

अखेर आयपीएलचा मुहूर्त ठरला; आयपीएलच्या तारखांबाबत बीसीसीआयची अधिकृत घोषणा

“मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी?”

‘50% लहान मुलांच्या शरिरात कोरोना अँटीबाॅडी’; लसीच्या चाचणीपुर्वी धक्कादायक खुलासा

“तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका”

…म्हणून वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील फडणवीसांच्या पुतण्याला लस दिली गेली!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More