बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोथरूडचे मतदार डोक्यावर पडलेले आहेत असं समजून या कार्यक्रमाचं आयोजन!”

पुणे |  कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी त्यांच्या प्रचारार्थ कलम 370 वर लडाखचे खासदार जयमांग नामग्याल यांचं खास व्याख्यान आयोजित केलं आहे. यावरच आता टीका होऊ लागली आहे. कोथरूडचे मतदार डोक्यावर पडलेले आहेत असं समजून या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, अशी खरमरीत टीका सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केली आहे.

कोथरूडचे मतदार डोक्यावर पडलेले आहेत असं पक्कं समजून हा कार्यक्रम घेतलेला दिसतोय. काय संबंध कोथरूडचा आणि 370 कलमाचा? यापाठीमागचं नेमकं लाॅजिक काय आहे? असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

समजा चंद्रकांत पाटील कोथरूडमध्ये निवडून आले तर यापुढे 370 सारखे कलम कोणत्याही केंद्र सरकारला करता येणार नाही असा कायदा महाराष्ट्र विधानसभेत करून घेणार आहेत का? असा मिश्किल टोलाही त्यांनी पाटील यांना लगावला आहे.

9 ऑक्टोबर रोजी कोथरूडमधल्या सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी संध्याकाळी 4.30 ते 6 या दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘एक चर्चा कलम 370, 35 अ आणि लडाख’ वर अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More