Loading...

आता ती महिला म्हणते, महापौरांनी माझा हात पिरगळलाच नाही!

मुंबई | महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग देखील केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांताक्रुज आंदोलनातील त्या महिलेने म्हटलं आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेचा हात मुरगळल्याचा व्हीडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरच व्हीडिओमधील महिलेने तिची भूमिका मांडली आहे.

Loading...

मी महाडेश्वर सरांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी सतत माझ्याकडे आग्रह धरत आहेत. पण मला या राजकारणात अजिबात रस नाही, असं त्या महिलेने म्हटलं आहे.

दरम्यान, माझा विनयभंग झालाच नाही. व्हीडिओ व्हायरल झाल्याने महाडेश्वर सरांची आणि माझी विनाकारण बदनामी होत आहे, असं या घटनेतील संबंधित महिलेने सांगितलं आहे.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-ते शिवसेनेतून आले, राष्ट्रवादीकडून हरले आणि पुन्हा शिवसेनेत निघून गेले!

-ही गुन्हे शाखा आहे की सेटलमेंट ब्रॅन्च आहे?; आर्थिक गुन्हे शाखेच्या कामगिरीवर संजय बर्वे संतापले

Loading...

-मुंबईच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्तपदी ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती?

-आदित्य ठाकरेंना भाजपच्या नगरसेवकांनी रोखलं; युतीतील मतभेद चव्हाट्यावर

-रक्षाबंधनच्या मुहूर्तावर केजरीवाल सरकारचं महिलांसाठी स्पेशल गिफ्ट; भाऊबीजेपासून अंमलबजावणी

Loading...