बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एमआयएम हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष- विश्वंभर चौधरी

मुंबई | एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी एमआयएम पक्ष आणि वारिस पठाण याचा जोरदार समाचार घेतला आहे.

एमआयएम हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष आहे, असं म्हणत चौधरी यांनी टीका केली आहे. एमआयएम हा मुसलमानांचा नाही तर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुस्लीमांचा पक्ष आहे. या लोकांना फक्त धर्माच्या नावावर भेद निर्माण करायचं आहे, असं ते म्हणाले आहेत.

रझाकारांच्या नादाला लागून जे मुस्लिम एमआयएमला मतदान करतात तेवढं मतदान त्यांना होतं. एमआयएम आणि रझाकारांकडे विचारच नव्हता तर त्यांना फक्त धर्माच्या आधारावर मांडणी करायची होती. त्यांना फक्त धर्मांध मुसलमानांची राजवट एवढाच त्यांच्या डोक्यात विचार होता, असंही ते म्हणाले आहेत.

आपल्या मराठवाड्याचे नतद्रष्टे राजकारणी ज्यांना फक्त जातीय ध्रुवीकरण करायचं आहे त्यांच्यामुळे एमआयएम पहिल्यांदा नांदेडमध्ये घुसली आणि त्यानंतर ती पुढे पसरत गेली. तरीदेखील एमआयएमला मोठा आधार नाही, असंही विश्वंभर चौधरी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या अन्यथा…- रामदास आठवले

सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं- गिरीराज सिंह

महत्वाच्या बातम्या-

तमाशाने कोणी बिघडत नाही आणि कीर्तनाने कोणी सुधरत नाही- रघुवीर खेडकर

सीएएला घाबरण्यासारखे काहीही कारण नाही; मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

“राधाकृष्ण विखे पाटील लवकरच महाविकास आघाडीत दिसतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More