Loading...

माझ्या गावाला तिन्ही बाजूने पूराचा विळखा पण…- नांगरे पाटील

सांगली | माझ्या गावाला तिन्ही बाजूने वारणा नदीने विळखा घातलाय. वारणेला पूर आला होता. आमच्या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला होता. पण गाव टेकडीवर असल्यामुळे कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही, असं नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.

सांगली कोल्हापूरमध्ये पूरामुळे मोठं नुकसान झालं आहे. लोकांचे संसार वाहून गेलेत. देशभरातून मदत येतेय. सरकार परिस्थिती पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही ते म्हणाले.

Loading...

मी अक्षय कुमारशी बोललो आहे. त्यांने गाव दत्तक घेण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही पाटलांनी सांगितलं. चंद्रकांत पाटलांनीही गावं दत्तक घेण्याचा मोठा प्लॅन असल्याचंही नांगरे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, माणसं गेली, जनावरं, मालमत्ता गेली, शेती कुजली सगळी परिस्थिती भयानक आहे. अशात नांगरे पाटील यांना ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’ ही कुसुमाग्रजांची कविता आठवली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेनं गणवेश सक्ती करू नये- आशिष शेलार

-मी शिवसैनिक आहे; घाबरत नाही तर लढतो- अंबादास दानवे

-“किती दिवस तीच ती भाषणं ऐकणार?”

Loading...

-“220 चा आकडा पार करण्यासाठी नगरमध्ये आता 12 विरूद्ध शून्यची लढाई”

-…तर बलुचिस्तानमध्ये पहिली मूर्ती नरेंद्र मोदींची उभी करु!

Loading...