मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांशी चर्चा केली आहे.
शरद पवारांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिल्यानंतर आता विश्वास नांगरे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
विश्वास नांगरे पाटील सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून धनंजय मुंडेंवरच्या बलात्काराच्या आरोपांनंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.
धनंजय मुंडे प्रकरणात विश्वास नांगरे पाटील मैदानात उतरल्यानं ते हे प्रकरण कशा पद्धतीनं सोडवतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘तीने मला घरी नेलं आणि माझ्यासोबत…’; मनसेच्या संतोष धुरींनी दिली धक्कादायक माहिती
प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका- पंकजा मुंडे
नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून जावयाने काहीही करावं का?- सुधीर मुनगंटीवार
कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्मानं मौन सोडलं; केला मोठा खुलासा
धनंजय मुंडेच नव्हे तर ‘या’ व्यक्तिविरोधातही रेणू शर्मानं तक्रार केल्याचं उघड