Vitamin B12 Deficiency Remedies | शरीरातील खनिजे आणि पोषक तत्वे कमी झाल्यास समतोल बिघडतो आणि व्यक्ती आजारी पडते. त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे शरीरातील पोषक तत्वे आणि प्रथिनांची कमतरता भरून निघेल. त्यातच आपल्या शरीरात अत्यंत महत्वाचं पोषक तत्व म्हणजे व्हिटॅमिन बी 12 आहे.याची कमतरता झाल्यास अनेक समस्या उद्भवतात.
याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात व्हिटॅमिन, मिनरल, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स यासारख्या पदार्थांच्या समावेश असणे गरजेचे आहे. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर थकवा जाणवणे, दम किंवा धाप लागणे, भूक न लागणे किंवा भूक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं कोणती?
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शारीरिक, न्यूरोलॉजिकल आणि मानसिक लक्षणे दिसू शकतात.यामध्ये खूप थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, मळमळ, उलट्या किंवा अतिसार, नेहमीप्रमाणे भूक न लागणे, वजन कमी होणे,तोंडात किंवा जिभेत वेदना होणे यासोबतच
पिवळी त्वचा पडणे अशी लक्षणे दिसू लागतात.
इतकंच नाही तर, व्हिटॅमिन बी 12 च्या (Vitamin B12 Deficiency Remedies)कमतरतेमुळे उदासीनता, चिडचिडेपणा, वागणुकीत बदल अशी काही लक्षणे दिसून येतात. एकंदरीत या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ लागतात. आता ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात पुढील पदार्थांचा समावेश करु शकता.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हे पदार्थ भरून काढतील
अंडी : अंड्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. अंड्यातील पिवळे बलक हे व्हिटॅमिन बी 12 चे समृद्ध स्त्रोत आहे. यासोबतच कन, टर्की, ऑइली मासे, खेकडे यात देखील व्हिटॅमिन बी 12 भरपूर असते.
मासे : सॅल्मन, ट्यूना या सारख्या माशांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यामुळे या माशांचा आहारात समावेश करावा. यामुळे ही समस्या दूर होईल.
मांस : जर तुम्ही मांसाहारी असाल तर, व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12 Deficiency Remedies) ची कमतरता खूप लवकर पूर्ण होईल. तुम्ही मटण, चिकन खाऊ शकता. व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण एनिमल प्रोडक्ट मध्ये जास्त असते.
दुग्धजन्य पदार्थ : शाकाहीर असाल आणि मांस, अंडी यांचा आहारात समावेश करता येत नाही. अशात तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. तो चांगला पर्याय आहे. आहारात दूध, चीज आणि ताक यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्यास शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून निघेल.
News Title : Vitamin B12 Deficiency Remedies
महत्त्वाच्या बातम्या-
बुलढाण्यात मोठी दुर्घटना; वादळी वाऱ्यामुळे झोक्यात झोपलेली चिमुकलीही पंत्र्यांसोबत उडाली
“भारतीयांनी आळशी होऊ नये, देश अजूनही..”; कंगना रनौतचं मोठं आवाहन
देशातील प्रथम महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा!
“मी त्याचा फोन उचलला नाही की तो मला शारीरिक…”,ऐश्वर्या रायने केला खुलासा
बाहेर पडताना काळजी घ्या! ‘या’ भागांत वादळी वाऱ्याचा पाऊस होणार