Vitamin C rich fruits | राज्यात सध्या तापमानात अनेक बदल होत आहेत. कधी ऊन तर कधी अवकाळी पाऊस असं चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्यातच विटॅमिन C समृद्ध फळे खास उन्हाळ्यात आवर्जून खाल्ली जातात. कारण, या काळात याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात.
इतकंच नाही तर, ही फळे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरतात.व्हिटॅमिन सी प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. संत्री, स्ट्रॉबेरी आणि किवी या व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.
व्हिटॅमिन C समृद्ध फळे खाण्याचे फायदे
त्वचेची काळजी : उष्ण सूर्यप्रकाशाचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे सनबर्न, डिहायड्रेशन आणि अकाली वृद्धत्व यासारख्या समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन सी त्वचेचे आरोग्य सुधारण्यात, कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी, जळजळ कमी करण्यात आणि अतिनील हानीपासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेची चमक आणि लवचिकता टिकून राहण्यास मदत होते.
पचन सुधारते : जड जेवणामुळे उन्हाळ्यात पचनास त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन सी समृद्ध फळांमध्ये एंजाइम आणि फायबर असतात जे पचनास मदत करतात.त्यामुळे तुमच्या आहारात आंबा, बेरी आणि किवी यांसारख्या फळांचा समावेश असायला हवा.
ऊर्जा वाढवण्यास मदत : दमट हवामानामुळे लवकर थकवा येतो. अशावेळी व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते, ते अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास आणि थकवा दूर करण्यास मदत करते. तुमच्या आहारात स्ट्रॉबेरी, अननस आणि किवी सारख्या फळांचा समावेश केल्यास तुम्हाला कायम फ्रेश आणि ऊर्जादायी वाटेल.
व्हिटॅमिन सी किती प्रमाणात घ्यावे?
पुरुषांसाठी व्हिटॅमिन सी ची दैनिक (Vitamin C rich fruits) गरज अंदाजे 90 मिलीग्राम आणि महिलांसाठी 75 मिलीग्राम असते. त्यामुळे दररोज 100 ते 200 ग्रॅम लिंबूवर्गीय फळांचे सेवन उपयुक्त आहे. मात्र, प्रत्येक फळातील व्हिटॅमिन सीचे प्रमाण भिन्न असू शकते. त्यामुळे संतुलित प्रमाणात व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचे सेवन केले पाहिजे.
News Title- Vitamin C rich fruits benefit
महत्त्वाच्या बातम्या –
पीएफ खात्यातून तुम्ही कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता?
‘प्रत्येक वेळेला हे बोहल्यावर चढतात’; उद्धव ठाकरेंनी मोदींना सुनावलं
गरोदरपणात महिलांचा आहार कसा असावा, जाणून घ्या ICMR ची मार्गदर्शक तत्त्वे
घराचं स्वप्न महागलं; ‘या’ प्रमुख शहरांमध्ये घराच्या किंमतीत वाढ
‘तारक मेहता…’ मधील सोढी अखेर घरी परतला; एवढ्या दिवस कुठे होता?, धक्कादायक खुलासा समोर