Vitamin-D deficiency | शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला त्यातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भरून काढावी लागते. या पोषक तत्वांमध्ये व्हिटॅमिन-डी हे एक महत्त्वाचे जीवनसत्व आहे, ज्याच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत आणि आजारी पडू शकते. (Vitamin-D deficiency)
व्हिटॅमिन-डी रोगप्रतिकारक शक्तीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, ज्याची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आपल्या दैनंदिन आहारातही व्हिटॅमिन-डीचा समावेश केला पाहिजे. हाडांमध्ये अशक्तपणा जाणवणे हे देखील शरीरातील या जीवनसत्वाच्या कमतरतेचे लक्षण आहे. चला तर मग आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊया याच्या कमतरतेची लक्षणे.
काय सांगतात तज्ज्ञ?
व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेची ही लक्षणे सामान्य लक्षणांपेक्षा काहीशी वेगळी आहेत परंतु समजून घेण्यासारखी आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे गंभीर समस्येचे कारण बनू शकते.
हे आहेत संकेत
आजारी पडणे: जर तुम्हाला नेहमी ताप किंवा सर्दी-खोकला होत असेल तर हे शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेचे लक्षण आहे कारण त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो.
पाठदुखी: नेहमी पाठ आणि कंबर दुखणे हे देखील या जीवनसत्वाच्या कमतरतेचे एक लक्षण आहे. (Vitamin-D deficiency)
केस गळणे: जर तुमचे केस गुच्छेच्या गुच्छे गळत असतील तर हे देखील शरीरातील व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेचे लक्षण आहे.
थकवा: जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सतत थकवा जाणवत असेल तर हे देखील शरीरातील व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेचे लक्षण आहे.
काय करावे?
जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन-डीची पातळी तपासून योग्य उपचार करतील. तसेच, आहारात व्हिटॅमिन-डी युक्त पदार्थांचा समावेश करा जसे की, मासे, अंडी, दूध, संत्र्याचा रस इत्यादी. सकाळी कोवळ्या उन्हात बसणे हा देखील व्हिटॅमिन-डी मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
Title: Vitamin-D Deficiency Can Be Costly Recognize These 7 Signs and Take Action