Top News महाराष्ट्र सोलापूर

पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग… लगीन देवाचं लागतं… पाहा व्हिडीओ

Photo Courtesy- Facebook/Vitthal Rukmini Mandir, Pandharpur

पंढरपूर। आज वसंतपंचमी म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची तिथी… याच मुहूर्तावर साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणीचा विवाहसोहळा दरवर्षी संपन्न होत असतो. शेकडो वर्षांची परंपरा आज देखील मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. वसंत पंचमी म्हणजे निसर्गाचा सोहळा मानला जातो. त्यामुळे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर रंगेबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे. पण कोरोनामुळे यंदा हा सोहळा भाविकांना घरातूनच पहावा लागेल.

विठ्ठल रुक्मिणीचा विवाहाचा पेहराव बंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन केला आहे. वसंत पंचमी ते रंगपंचमी विठ्ठल रुक्मिणीला पांढरे कपडे घातले जातात. विठुरायासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे आणली आहेत. तर मोत्यांनी बनवलेला शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम हे कपड्यावर असतील. तर रुक्मिणी मातेसाठी सिल्कची कांजीवरम तयार केली आहे.

रुक्मिणी मातेकडून आलेला गुलाल देवाच्या अंगावर टाकला जाईल तर देवाकडचा गुलाल रुक्मिणी मातेच्या अंगावर टाकण्यात टाकण्याची परंपरा आहे. बरोबर दुपारी 12 वाजण्याच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

विठ्ठल मंदिर सजवण्यासाठी पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांनी जवळपास 5 टन रंगीबेरंगी विविध प्रकारच्या फुलांची सजावट या सोहळ्यानिमित्त केली आहे. याच बरोबर मंदिरासह विवाह मंडपाला देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. अॅथोरियम, रंगीत गुलाब, ओर्केड जरबेरा, मोगरा यासह विविध प्रकारची फुले यामध्ये आहेत.

दर वर्षी या सोहळ्याला मोठी गर्दी असते. यंदा कोरोनामुळे सोहळा भाविकांना घरातूनच हा सोहळा पहावा लागणार आहे. तरीही मंदिरात उत्साह कमी होणार नाही. शासकीय नियमांचं पालन करुन हा सोहळा पार पडेल.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या –

टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; बीडमधला संशयित फरार!

भारतीयांना जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमवर दिवस-रात्र क्रिकेट सामना पाहण्याची संधी

सावधान!!! कोरोनाचा धोका वाढतोय, आता महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही संचारबंदी!

सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या; फेसबुकवर शेअर केला व्हिडीओ

राजकीय कार्यक्रमांवरही लवकरच निर्बंध?, अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या