बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या आत्महत्येनंतर विवेक ओबेरॉयचं खुलं पत्र; इंडस्ट्रीला झाप झाप झापलं…!

मुंबई |  सुशांत सिंग राजपूतच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात आले. या अंतिम संस्काराला अभिनेता विवेक ओबेरॉय उपस्थित होता. यानंतर घरी गेल्या गेल्या विवेक एक खुलं पत्र लिहून बॉलिवूड इंडस्ट्रीला झाप झाप झापलं आहे.

“सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून आज मला खूप त्रास झाला. मला जर त्याच्याशी बोलता आलं असतं तर त्याच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला असता. मी देखील अशा प्रसंगातून गेलोय. मला कल्पना आहे आहे की सुशांतला या काळात किती त्रास झाला असेल”, असं विवेक म्हणाला.

“आज मी सुशांतला मुखाग्नी देताना त्याच्या वडिलांना पाहिलंय. त्यांच्या डोळ्यात काय दु:ख होतं हे शब्दात मांडणं कठीण आहे. त्याची बहीण त्याला परत ये… म्हणून जोरात रडत होता. हे सगळं थरारक होतं”, असंही विवेकने म्हटलं आहे.

पुढे बोलताना इंडस्ट्रीकडे बोट दाखवत विवेक म्हणतो, “सगळे इंडस्ट्रीला कुटुंब समजतात. त्या इंडस्ट्रीला आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अहंकार बाजुला ठेवून प्रतिभावान आणि विचलित झालेल्या लोकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकमेकांबद्दल गॉसिप कमी करण्याची आणि काळजी जास्त करण्याची आता गरज बनली आहे”

 

 

View this post on Instagram

 

#RIPSushantSinghRajput 🙏

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi) on

 

ट्रेंडिंग बातम्या-

करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

महत्वाच्या बातम्या-

सुशांतला अशाप्रकारे अपमानित करणं योग्य होतं का?; गायिकेनं शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

महाविकास आघाडीत कुरबूर, शिवसेनेचे सामनातून काँग्रेसला चिमटे

कसलीही हौसमौज अन् बडेजाव न करता पार पडला मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा विवाह सोहळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More