Vivek Oberoi | बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेराॅय कायम त्याच्या प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. एवढंच नव्हे तर एकेकाळी विवेक आणि ऐश्वर्या यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अजूनही ऐश्वर्या आणि विवेक यांच्याबाबत बोललं जातं. मात्र, काही दिवसांनंतर या दोघांचं ब्रेकअप झालं आणि त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्न केलं तर विवेकसुद्धा त्याच्या वैवाहिक आयुष्यात खुश आहे. दरम्यान, अशातच विवेकने त्याच्या आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
“तिच्यामुळे मला प्रेम समजलं”
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना विवेकने त्याच्या पत्नीचं कौतूक केलं. बोलत असताना विवेक म्हणाला की, माझ्या पत्नीवर म्हणजेच प्रियंकावर मी वेड्यासारखा प्रेम करतो. तिच्यासोबतचं माझं नातं खूप विशेष आहे. एवढंच नाही तर, जेव्हा केव्हा प्रियंका मेकअप करत असते, तेव्हा मी तिची प्रशंसा करतो. हा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा रोमान्स आहे. याआधी मी प्रेमात, खूप मोठ मोठ्या गोष्टी केल्या, मात्र, त्यापेक्षा सुद्धा छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे मला प्रियंकामुळेच कळालं. मी तिला (Vivek Oberoi) फ्लॉरेन्समध्ये अत्यंत ग्रँड पद्धतीने प्रपोज केलं होतं. मात्र हे तुम्ही प्रत्येक वेळी करू शकत नाही. अशा वेळी छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
View this post on Instagram
तिच्याशिवाय जगू शकत नाही-
यावेळी विवेकने (Vivek Oberoi) ऐश्वर्यासोबतच्या नात्यावर देखील भाष्य केलं. ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, कोणाशीच लग्न करण्याची माझी इच्छा नव्हती. या मुलीला मला भेटायचंच नाही ते या मुलीशिवाय मी राहूच शकत नाही इथपर्यंतचा हा माझा प्रवास आहे. तिला पाहताच मला समजलं होतं की तिच्यासोबतच मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. माझ्या मते लग्न म्हणजे एक टीम म्हणून एकमेकांचा विचार करून वागणं आणि काम करणं. या नात्यात विश्वास, प्रेम, आदर टिकला पाहिजे.
प्रियांकासोबतची माझी कमिटमेंट खूप वेगळी आहे. चौदा वर्षांच्या संसारात जेव्हा मी दररोज सकाळी उठून तिच्याकडे पाहतो आणि स्वत:लाच विचारतो की, या विश्वातल्या सर्व महिलांपैकी मी आजही तिची निवड करेन का? तर त्याचं उत्तर हो असंच येतं. मी तिचीच निवड करेन. तिला माझ्याकडून फक्त वेळेची अपेक्षा असते. वेळ मिळाल्यावर जेव्हा कधी मी तिच्यासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करतो, तेव्हा ती खूप उत्सुक होते. तिला महागड्या गोष्टींची फार हौस नाही, असं विवेकने सांगितलं.
News Title : vivek oberoi talks about her wife
महत्त्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या नेत्यांवर पुन्हा अन्याय! मोठं कारण आलं समोर
उद्धव ठाकरे अॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार?
बीडच्या ‘आका’बद्दल आमदार सुरेश धसांचा धक्कादायक खुलासा!
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!
‘कोणत्या दुनियेत आहात धनूभाऊ?, काही सिरीयसनेस…’, सरपंच हत्येवर आमदार धस संतापले