देश

या विदेशी लोकांनी देश लुटला; काँग्रेसचं नाव न घेता विवेक ओबेरॉयची टीका

नवी दिल्ली | जेव्हा जेव्हा या देशावर कोणत्या राज पुत्राने किंवा विदेशी लोकांनी राज्य केलं तेव्हा या लोकांनी केवळ देश लुटला आहे, असं म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉयने नाव न घेता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे.

नवी दिल्ली मध्ये इंडिया गेट येथे आयोजित केलेल्या भाजपच्या ‘सातो सीटें मोदी को’ कार्यक्रमात विवेक ओबेरॉयने सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी माध्यामांसोबत बोलताना त्याने राहुल गांधीवर निशाणा साधला.

या देशाचे सर्व नागरिक देशाचे चौकीदार आहेत. हे चौकीदार यापुढे या देशाला लुटू देणार नाहीत, असं म्हणत विवेक ओबेरॉयने चौकीदार शब्दाची पाठराखन केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय निश्चित आहे, असं भाकित विवेक ओबेरॉयने वर्तविलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘या’ कारणामुळे देशभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव

-माझ्यावर होणारे हल्ले भाजपने घडवून आणले- अरविंद केजरीवाल

-ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींचा फोन घेण्यास टाळाटाळ!

-लढाई संपली आहे, तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय; राहुल गांधींचा मोदींना टोला

-कंगणा राणावत, विवेक ओबेराय, गजेंद्र चौहान यांचा मोदींना जाहीर पाठिंबा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या