गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणाऱ्या वैजिनाथ पाटीलची जामीनावर सुटका

मुंबई |उच्च न्यायालयाचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई येथे न्यायालयाबाहेर हल्ला करणाऱ्या वैजिनाथ पाटील याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. 

मराठा आरक्षणाला विरोध केल्याने वैजिनाथ पाटील याने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. 

वैजनाथ पाटील हा जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील मुरमा गावचा रहिवासी आहे. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून गेल्या चार महिन्यापासून तो नोकरीच्या शोधात होता.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना वैजिनाथ पाटील याने ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत सदावर्ते यांच्यावर हल्ला केला होता. 

महत्वाच्या बातम्या –

-पप्पू आता परमपुज्य झाले- राज ठाकरे

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

-जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

-“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”