Vivo V50 लवकरच भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही!

Vivo भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo V50 लॉन्च करण्यासाठी सज्ज झाला आहे. अद्याप कंपनीने फोनच्या लाँचची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु लीक झालेल्या पोस्टरवरून असे दिसून येते की हा फोन १८ फेब्रुवारीला लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या कंपनीने या फोनसाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे, ज्यामध्ये फोनच्या डिझाईन, कॅमेरा फीचर्स आणि इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या फोनबद्दल अधिक माहिती.

Vivo V50 ची खास वैशिष्ट्ये :

कंपनीने या फोनसाठी तयार केलेल्या मायक्रोसाइटवरून फोनचे डिझाइन आणि कॅमेरा फीचर्स उघड झाले आहेत. डिझाइनच्या बाबतीत, हा फोन जुन्या मॉडेल (Vivo V40) सारखाच ठेवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला एक उंच, गोळीच्या आकाराचा आयलंड मिळेल, ज्यावर गोलाकार कॅमेरा मॉड्यूल असेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात येणार आहे.

याशिवाय, फोनमध्ये 6,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात येईल. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या बॅटरीसह येणारा हा सर्वात स्लिम फोन असण्याची शक्यता आहे. रंगांच्या बाबतीत, हा फोन रोज रेड, टायटेनियम ग्रे आणि स्टारी ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. यातील स्टारी ब्लू रंगाचा पर्याय 3D-स्टार तंत्रज्ञानासह येऊ शकतो, ज्यामुळे फोनचा मागील भाग ताऱ्यांनी सजलेल्या रात्रीच्या आकाशासारखा दिसेल. हा फोन IP68 आणि IP69 प्रमाणित डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससह येईल.

डिस्प्ले आणि कॅमेरा फीचर्स :

Vivo च्या या स्मार्टफोनमध्ये ४१ डिग्री वक्रता असलेला क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आहे. यात ०.१८६ सेमीचे अल्ट्रा-स्लिम बेझल आणि अधिक चांगल्या ड्रॉप रेझिस्टन्ससाठी डायमंड शील्ड ग्लासचा थर दिला जाऊ शकतो.

कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo V50 मध्ये Zeiss-ब्रँडेड फ्रंट आणि रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. फोनच्या मागील बाजूस ५०MP क्षमतेचा OIS मुख्य कॅमेरा सेन्सर आणि ५०MP क्षमतेचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स मिळेल, ज्यातून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल. याशिवाय, यात ५०MP क्षमतेचा फ्रंट-फेसिंग सेल्फी कॅमेरा देखील असेल. याव्यतिरिक्त, फोनमध्ये मल्टीफोकस पोर्ट्रेट मोड देखील मिळेल, ज्याद्वारे वापरकर्ते २३mm, ३५mm आणि ५०mm फोकल लेंथमध्ये व्हिडिओ बनवू शकतात.

News Title : vivo-v50-india-launch-soon-expected-price-specifications-and-features