Vivo V50 Smartphone | विवोने (Vivo) आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन विवो (Vivo V50 Smartphone) लाँच केला आहे. हा फोन V40 चा सक्सेसर (Successor) असून अनेक सुधारणांसह सादर करण्यात आला आहे. विवोच्या ‘व्ही’ मालिकेत यावर्षी लाँच होणारा हा पहिलाच फोन आहे. मध्यम श्रेणीत लाँच झालेल्या या फोनमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची सर्व वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
वैशिष्ट्ये
या फोनमध्ये क्वाड-कर्व्ह डिस्प्ले (Quad-Curved Display) आहे, जो डायमंड शील्ड ग्लास प्रोटेक्शनसह (Diamond Shield Glass Protection) येतो. धूळ आणि पाणी प्रतिरोधक क्षमतेसाठी याला IP68+IP69 रेटिंग मिळाले आहे. हा फोन टायटॅनियम ग्रे (Titanium Grey), रोझ रेड (Rose Red) आणि स्टारी ब्लू (Starry Blue) रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या फोनमध्ये अनेक एआय (AI) फीचर्स दिले आहेत, ज्यात सर्कल टू सर्च (Circle to Search), एआय ट्रान्सक्रिप्ट (AI Transcript), एआय लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन (AI Live Call Translation) इत्यादींचा समावेश आहे. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 (Qualcomm Snapdragon 7 Gen 3) चिपसेट प्रोसेसर आहे, जो 12GB रॅमसह (RAM) येतो.
कॅमेरा
विवोच्या (Vivo) या नवीन स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप (Dual Camera Setup) आहे. यात OIS सह 50MP चा मुख्य सेन्सर आणि 50MP चा अल्ट्रावाइड लेन्स (Ultrawide Lens) आहे. हे दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला (4K Video Recording) सपोर्ट करतात. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात ऑटो फोकससह (Auto Focus) 50MP चा फ्रंट कॅमेरा (Front Camera) आहे. यात वेडिंग पोर्ट्रेट स्टुडिओ (Wedding Portrait Studio) आहे, जो लग्नात उत्कृष्ट फोटो काढण्यास मदत करतो. (Vivo V50 Smartphone)
बॅटरी
या फोनमध्ये 6,000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, इतक्या मोठ्या बॅटरीसह येणारा हा त्यांच्या विभागातील सर्वात पातळ फोन आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला (90W Fast Charging) सपोर्ट करते.
किंमत आणि उपलब्धता
Vivo V50 ची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते आणि 256GB व्हेरिएंटची (Variant) किंमत 36,999 रुपये आहे. आजपासून या फोनची प्री-बुकिंग (Pre-booking) करता येईल आणि 25 फेब्रुवारीपासून विक्री सुरू होईल. हा फोन कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर (E-Store) आणि फ्लिपकार्टवरून (Flipkart) खरेदी करता येईल. (Vivo V50 Smartphone)
Title : Vivo V50 smartphone launched in India