बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने जगाचं टेंशन वाढलं

मॉस्को | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) दिवसेंदिवस भयावह रूप येत आहे. रशियाकडून होत असलेले बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले यामुळे युक्रेनमधील शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेन सैनिकांसह शेकडो सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला.

युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती भयावह असताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याला न्युक्लीअर वॉर ड्रिल (Nuclear War Drill) अर्थात अणुयुद्ध सराव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पुतिन यांच्या या निर्णयाने संपूर्ण जगाचं टेंशन वाढलं आहे.

रशियाने (Russia) दोन दिवसांपूर्वी युक्रेनवर ‘किन्झल हायपरसोनिक’ क्षेपणास्त्र हल्ला केला. 2 हजार किमी मारक क्षमता असलेल्या किन्झलचा अणुबॉम्ब टाकण्यासाठी देखील वापर करू शकतो. त्यामुळे रशियाने किन्झलचा वापर करून त्यांचं पुढचं पाऊल स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पुतिन यांच्या या निर्णयाचा परिणाम भयानक होऊ शकतो, असं क्रेमलिन येथील अधिकाऱ्यांचं देखील मत आहे. व्लादिमीर पुतिन स्वत: युद्धसरावात सहभागी होणार असून त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सायबेरियातील एका हायटेक अंडरग्राऊंड बंकरमध्ये हलविलं असल्याचं समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो…’,करूणा शर्मांचं खळबळजनक वक्तव्य

Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

Russia Ukraine War | रशियन सैनिकांविषयी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

“माझा नंबर पहिला येतो, पण काही लोक….”; फडणवीसांचा घणाघात

उन्हाच्या तडाख्यानंतर ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More