बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात महागडा घटस्फोट; प्रसिद्ध उद्योगपतीच्या बायकोनं मागितली तब्बल ‘इतकी’ पोटगी

लंडन | जगातील सर्वात श्रीमंत (Rich) व्यक्ती राहिलेल्या बिल गेट्स (Bill Gates) यांनी आपल्या पत्नीला घटस्फोटानंतर (Divorced) भलीमोठी रक्कम पोटगी म्हणून दिली होती.  हे प्रकरण जगभर गाजलं होतं. त्यांतर काही काळापूर्वी जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी आपल्या पत्नीला तब्बल 2.75 लाख कोटी रक्कम पोटगी म्हणून दिली होती. अशातच आता आणखिन एक सर्वाधिक पोटगीचं प्रकरण समोर आलं आहे.

रशियाचे प्रसिद्ध उद्योगपती व्लादिमीर पोतानिन (Vladimir Potanin) यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर त्यांच्या पत्नीनं लंडनच्या (London) एका न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला आहे. पोतानिन यांच्या पत्नीनं त्यांच्या एकुण संपत्तीच्या 50 टक्के वाटा मिळवा अशी मागणी केली आहे. पोतानिन यांच्या कंपनीचा अर्धा हिस्सा मागण्यात आला आहे.

कंपनीची सध्याची किमंत ही तब्बल 14 अब्ज डाॅलर्स इतकी आहे. पोतानिन यांची पत्नी नतालिया यांच्या बाजून न्यायालयानं निकाल दिला तर पोतानिन यांना 5400 कोटीं रपये नतालिया यांना द्यावे लागणार आहेत. परिणामी हा घटस्फोट जगातील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा महागडा घटस्फोट ठरणार आहे. सध्या सर्वत्र पोतानिन यांचीच चर्चा आहे.

दरम्यान, व्लादिमीर पोतानिन हे रशियाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांनी रशियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मोठी मदत केली आहे. पण सध्या त्यांनाच कोणीतरी चांगल्या वकीलानं मदत करण्याची गरज आहे हे नक्की.

थोडक्यात बातम्या 

अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; केली ‘ही’ मोठी घोषणा

धक्कादायक! एकाच शाळेत ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

“राजकारणच करायचंय तर समोरासमोर करा, बायका मुलांवर हल्ले कशाला?”

“पोलिसांच्या गराड्यातून बाहेर निघून दाखवा, मग तुम्हाला…”, राऊतांना खुलं आव्हान

Omicron | मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More