बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींनी अभिनेता इरफान खानला वाहिली श्रद्धांजली; म्हणाले…

नवी दिल्ली | आपल्या अभिनयाने मनोरंजन सृष्टीवर छाप सोडणारा अभिनेता इरफान खान याचे आज सकाळी मुंबईमधील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये निधन झालं. इरफानच्या निधनाच्या बातमीनंतर मनोरंजन, राजकीय आणि क्रिडा क्षेत्रातील दिग्दजांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

इरफान खानच्या निधनाने चित्रपट तसेच नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान झालं आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याने साकारलेल्या अष्टपैलू भूमिकांसाठी तो कायमच आपल्या लक्षात राहील, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी इरफान खानला श्रद्धांजली वाहिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

माझ्या सद्भावना त्याचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांबरोबर आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो, असंही मोदींनी इरफानला श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी

महत्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांना भरलेल्या फीचे पैसे मिळणार परत; आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

अभिनेता इरफान खानचं निधन; ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आयटी कंपन्यांना तब्बल इतक्या दिवसांपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’; केंद्र सरकारची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More