vodafone-idea | मोबाइल वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियाने यूजर्सना मोठा धक्का दिलाय. कंपनीने त्यांच्या सर्व योजनांमधून Vi Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन काढून टाकले आहे.
यापूर्वी वापरकर्त्यांना एकाच लॉगिनसह अनेक OTT ॲप्सचा मोफत प्रवेश मिळत होता. प्लॅनसह येणारी ही मोफत सुविधा ग्राहकांना खूपच भावली होती. काही मीडिया रिपोर्टनुसार आता ही सुविधा बंद करण्यात आलीये.
ही सुविधा आता कंपनीच्या वेबसाइट किंवा ॲपवर कोणत्याही प्लॅनमध्ये दिसणार नाहीये. कंपनीने आपल्या पेड सब्सक्रिप्शनसह वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.
Vi MTV Pro प्लॅन
कंपनीने आता वापरकर्त्यांना Vi MTV Pro प्लान ऑफरमध्ये आणलाय. पण, यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागणार आहेत.यूजर्सला दर महिन्याला साधारण 202रुपये यासाठी खर्च करावे लागतील.
तसेच, एक वर्षाचे सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला 2400 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरावे लागणार आहेत. वार्षिक सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना कंपनी कोणत्याही प्रकारची सूट देत नाही. या नवीन प्लॅनमध्ये (vodafone-idea) अनेक ऑफरचा समावेश आहे.
904 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा
यूझर्सना Disney + Hotstar, Sony Liv, Fancode, Hungama आणि Chaupal यासह एकूण 14 OTT ॲप्स मोफत वापरता येणार आहे. वोडाफोन-आयडियाने वापरकर्त्यांसाठी 904 रुपयांचा नवीन अमर्यादित प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2 जीबी डेटा मिळेल.
यामध्ये Binge ऑल नाईट देखील समाविष्ट आहे, जे मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटा प्रदान करते. यामध्ये कंपनी दर महिन्याला 2 GB पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. या (vodafone-idea)प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे.
News Title – vodafone-idea removes free subscription
महत्त्वाच्या बातम्या-
बॉलीवुडचा ‘किंग खान’ दिवसाला किती कमावतो?; आकडा वाचून हैराण व्हाल
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकूळ; पाच जणांचा मृत्यू
राज ठाकरे धुमाकूळ घालणार? पदवीधर निवडणुकीत मनसेची उडी
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! दहावीचा निकाल थोड्याच वेळात पाहता येणार या वेबसाईटवर
मुंबईकरांनो सावधान! या तारखेपासून पाणी कपात होणार, पाणी जपून वापरा