वोडाफोनकडून ग्राहकांना नवीन वर्षाचं खास गिफ्ट

मुंबई | नवीन वर्षात वोडाफोननं आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणलीय. वोडाफोन व्हाईस ओव्हर एलटीई म्हणजेच VoLTE सेवा सुरु करणार आहे. 

VoLTE सेवा देशात सर्वप्रथम जिओने सुरु केली होती. त्यानंतर एअरटेलने ही सेवा सुरु करण्याचा मान पटकावला होता. 

VoLTE सेवेमुळे ग्राहकांना फोनमधील डेटा वापरुन थेट एचडी व्हिडिओ कॉलिंग करता येतं. पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, कर्नाटक, गुजरात आणि कोलकात्यातून या सेवेची सुरुवात होईल, अशी माहिती वोडाफोनकडून देण्यात आलीय.