वाल्मिक कराडविरोधात सीआयडीचं सर्वात मोठं पाऊल!

Voice samples of Walmik Karad taken in extortion case

Walmik Karad | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासात सीआयडीने आता महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या अडचणी वाढू शकतात. कराड हा सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर देखील मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र, यात कराडचा समावेश नव्हता. त्याच्यावर फक्त 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने कराडवर मोक्का लावण्यात आला नाही.

मात्र वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावला जावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यातच सीआयडीने देखील मोठे पाऊल उचलले आहे. वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करावा, यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि विरोधकांचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सीआयडी (CID) पथकाने आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने घेतले.

खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा झाले

आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरुनच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देण्यात आली होती. विष्णु चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिली होती, अशी माहिती आहे. याबाबतची सर्व कॉल रेकॉर्डिंग आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे होती. तर, ज्या फोनवरून धमकी देण्यात आली तो विष्णु चाटेचा फोन होता. मात्र, विष्णु चाटेचा फोन अजूनही सीआयडीच्या हाती लागला नाही. त्यामुळे सीआयडीने कंपनीच्या अधिकाऱ्याकडे जी कॉल रेकॉर्डिंग होती त्यातील आवाज आणि कराडच्या आवाजाची चाचणी करण्याचा निर्णय घेतलाय.

या खंडणी प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरुन करण्यात आलेल्या कॉलमध्ये असलेल्या व्यक्तीचा आणि वाल्मिक कराडचा (Walmik Karad) आवाज जुळल्यास त्याच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. सीआयडी पथकाने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने गोळा केले आहेत. खंडणी प्रकरणाच्या तपासात हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

यापूर्वी सीआयडीने संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णु चाटेच्या देखील आवाजाचे नमुने घेतले होते. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाचे नमुने याप्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्की निर्मिती करणाऱ्या आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यासाठी विष्णू चाटे हा आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला होता.

जुनी एसआयटी बरखास्त करण्यात आली

येथून विष्णू चाटे याने फोन लावून कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आणि वाल्मिक कराड यांचे बोलणे करुन दिले होते. त्यानंतर कंपनीचे अधिकारी विष्णू चाटे याच्यासोबत वाल्मिक कराड यांना भेटायलाही गेले होते, असाही आरोप ठेवण्यात आला आहे. अशात सीआयडी आता वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्या फोनमधील रेकॉर्डिंगचा तपास करणार आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेली एसआयटी ही बरखास्त करण्यात आली आहे. यामधील अनेक अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता. याबाबत मागे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. त्यामुळे जुनी एसआयटी बरखास्त करुन नवी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.नव्या एसआयटी पथकात सहा जणांचा समावेश आहे. पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना एसआयटीच्या प्रमुखपदी कायम ठेवण्यात आले आहे.

News Title : Voice samples of Walmik Karad taken in extortion case

महत्वाच्या बातम्या-

मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू का खातात?, काय आहे त्यामागील कारण?

शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं निधन!

आज मकर संक्रांती, आपल्या प्रियजणांना द्या ‘या’ हटके शुभेच्छा!

आज मकर संक्रांतीला ‘या’ 3 राशींना येणार सोन्याचे दिवस!

शेतकऱ्यांनो ‘ही’ कामाची गोष्ट लवकर करा अन्यथा… पश्चाताप होईल

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .