Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यात 34 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच वारं घुमत आहे. राज्यातील जनतेचं लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल थांबला आणि आज शुक्रवार 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.

राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील काही गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्यात.

दरम्यान, मतदान प्रक्रियेसाठी काल गुरुवारी दुपारी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या वतीनं मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन्स तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेली सामग्री रवाना करण्यात आली. तसंच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचाही समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

रेणू शर्माच नव्हे तर त्यांचा वकीलही वादग्रस्त; या गोष्टीमुळे अडचणी वाढणार?

भाजप नेत्यामुळे धनंजय मुंडेंना राजकीय जीवदान; राजीनामा देणार नाहीत?

धनंजय मुंडे प्रकरणात IPS विश्वास नांगरे पाटील ‘ॲक्शन मोड’मध्ये!!!

‘तीने मला घरी नेलं आणि माझ्यासोबत…’; मनसेच्या मनिष धुरींनी दिली धक्कादायक माहिती

प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका- पंकजा मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या