बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संपुर्ण राज्यात गाजत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सुरूवात

नांदेड | संपूर्ण राज्यात गाजलेल्या आणि बहु चर्चित अशा देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यातच प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली.

आज सकाळी 7 वाजल्यापासून पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून एकूण 12 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. तसेच या चुरशीच्या लढतीत नेमका कोणाचा विजय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं मागच्या वर्षी कोरोनामुळे दुःखद निधन झालं होतं. त्यानंतर आता मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानुसार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली.

निवडणुकीपूर्वीच कट्टर शिवसैनिक असलेले सुभाष साबणे यांनी अतिशय भावनिक होत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता या निवडणुकीत दोन्ही पक्षांना कडवं आव्हान असलं तरी नेमकं कोण बाजी मारणार? हे निकालातून स्पष्ट होईलच. तसेच जनता कोणाच्या बाजूने कौल देणार?, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

थोडक्यात बातम्या

‘यावेळी गद्दारी सहन करणार नाही’, नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना भर सभेत खडसावलं

आता ‘या’ प्रवाशांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची मागणी झाली मान्य

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी महामंडळ चालु शकते एवढं त्याने कमावलंय’, राणेंचा पुन्हा एकदा वार

“शंभरपेक्षा जास्त लोकांना अडकवलंय, आता त्यांचा पर्दाफाश मी करणार”

रजनीकांत पुढचे काही दिवस रूग्णालयातच; तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More