कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला सुरूवात; मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी सकाळी सकाळीच मतदार केंद्रावर हजेरी लावून मतदानात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. या मतदानासाठी दोन्ही मतदारसंघात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत दिग्गजांनी जोरदार प्रचार केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,

या निवडणुकीत घोडेबाजार सुरू असल्याने त्याअनुषंगाने 14 पथकं तैनात करण्यात आली आहेत. आज एकूण 510 केंद्रावर मतदान होणार आहे. यात 13 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. 5 लाख 68 हजार मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-