…तर तिहेरी तलाक बंद करण्यासाठी केंद्र कायदा करेल- नायडू

Venkaiah Naidu
व्यंकय्या नायडू

अमरावती | जर मुस्लीम समाज पुढाकार घेऊन तिहेरी तलाक बंद करणार नसेल, तर केंद्र सरकारला कठोर पावलं उचलून याबाबत कायदा करेल, असं केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये ते बोलत होते.

मुस्लीम महिलांच्या समानतेच्या अधिकाराचा हा प्रश्न आहे. जर हिंदू महिलांना बालविवाह, सतीसारख्या प्रथांपासून मुक्त करण्यासाठी कायदे केले जात असतील तर मुस्लीम महिलांनाही कायदा करुन दिलासा दिला जाईल, असं ते म्हणाले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या