वेडची रेकाॅर्डतोड कमाई! आकडा वाचून तुम्हालाही लागेल वेड

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलियाचा(Genelia Deshmukh) ‘वेड'(Ved) चित्रपट मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरला आहे. हा चित्रपट अजूनही काही ठिकाणी चित्रपटगृहात दाखवला जात आहे.

दिग्दर्शक म्हणून रितेशचा हा पहिला चित्रपटआहे तर जेनिलायाचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. परंतु त्यांचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

वेड गतवर्षीच्या अखेरीस म्हणजेच ३० डिसेंबरला रिलीज झाला होता. आता हा चित्रपट रिलीज होऊन एक महिना पूर्ण झाला असतानाच आतापर्यंतची वेडची कमाई किती झाली आहे, हे समोर आलं आहे. वेडची रेकार्डब्रेक कमाई पाहून सर्वांच्याच भूवया उंचवल्या आहेत.

वेडनं आतापर्यंत जगभरातून 70.90 कोटींची कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, रितेश-जेनिलियाच्या जोडीला मराठी प्रेक्षकांनीही भरपूर प्रेम दिल्याचे दिसून आले. तसेच सलमान खाननं ‘वेड लावलंय’ या गाण्यातून शेवटी एन्ट्री घेत चित्रपटाला चार चाॅंद लावले.

महत्त्वाच्या बातम्या