Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘या’ रस्त्यावर 7 किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल होणार!

Photo- Twitter/PratikS94386239

पुणे | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शनिवारी पुणे दौऱ्यावर असताना अनेक कामांची पाहणी केली व प्रलंबित कामांचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. चांदणी चौकातील रखडलेल्या कामाच्या पाहणी नंतर गडकरींनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सर्वात जास्त वाहतूक कोंडी होत असलेल्या पुणे-नगर महामार्गाचा विचार केला असता तिकडे दुमजली उड्डाणपूल गरजेचा असल्याने त्या ठिकाणी वाघोली ते लोणीकंद असा सात किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल लवकरच उभा करणार असल्याची घोषणा गडकरींनी पत्रकारांशी बोलताना केली.

पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित दुमजली पुलाच्या आरेखनाचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी वेगळे भूसंपादन करण्याची गरज नाही, त्यामुळे हे काम येत्या सहा महिन्यात सुरु होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाघोली ते लोणीकंद मार्गावर सोळा लेनद्वारे वाहतूक करण्यात येणार आहे.

पुणे-नगर रस्त्याप्रमाणेच पुणे-औरंगाबाद रस्त्याचेही डायरेक्ट ऍक्सेस डिझाईन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, हा प्रकल्प 6 हजार कोटी रुपयांचा आहे त्याचबरोबर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 54 कि.मी महामार्गासाठी 600 कोटी रुपये मंजूर केले असल्याचेही गडकरींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

थोडक्यात बातम्या-

आता ‘या’ मुलानं लावली सोशल मीडियावर आग, लोक परत परत पाहात आहेत व्हिडीओ!

पुण्यातील ‘या’ उड्डाणपुलाचे काम वर्षभरात संपवा; नितीन गडकरींचे सक्त आदेश

…नाहीतर काम उखडून फेकीन; पुण्यात नितीन गडकरींची कंत्राटदाराला तंबी!

व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ओळख, मग महिलेकडून पैसे घेतले, नंतर पैसे देण्याच्या बहाण्याने…

पूजा चव्हाण प्रकरणात आम्हाला येत आहेत ‘या’ अडचणी- पोलीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या