बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ए तु थांब रे… मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना झापलं, पाहा व्हिडीओ

मुंबई | 22 जुलैपासून कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या. त्यानंतर 3 दिवसापुर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौरा केला होता. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे देखील नारायण राणे यांच्यासोबत चिपळूण दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्री दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर सोबत असलेल्या अधिकऱ्यांना त्यांनी फैलावर घेतलं. नारायण राणे अधिकाऱ्यांशी बोलत असताना प्रविण दरेकर मध्ये बोलले. त्यामुळे नारायण राणे यांनी दरेकरांना दम भरला.

तुम्हाला सोडू का? तुम्हाला माॅबमध्ये सोडू का ? अशा सवाल नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी प्रविण दरेकर मध्ये काहीतरी बोलले. त्यावर नारायण राणे यांनी दरेकरांना झापलं. ‘ए तु थांब रे…! मध्ये बोलू नको, असं नारायण राणे दरेकरांना म्हणाले. ही काय चेष्टा समजली, लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. लोक रडतात. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही हसतायेत आणि दात काढताय, असं राणे अधिकाऱ्यांना म्हणाले.

इथं काय करतो, ऑफिसमध्ये काय आहे. तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही, चला दाखवा ऑफिस कुठंय तुमचं, असंही राणे म्हणताना दिसत आहेत. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ शुट केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस देखील दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

पोस्टाची बंपर योजना; सेव्हिंग अकाऊंटवर मिळतंय बँकांपेक्षा जास्त व्याज

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर समर्थकाची आत्महत्या; शातंता राखण्याचं आवाहन

ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट; ममतांच्या ‘या’ मागणीवर मोदी म्हणाले ‘मी बघतो’

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; रस्त्याच्या कडेला बसलेल्या 18 कामगारांचा मृत्यू

कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी; सशस्त्र सेना दलाच्या अभ्यासात ‘ही’ माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More