बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उठ मराठ्या उठ! महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई | कर्नाटकमधील बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचा अवमान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळं फासण्यात आलं. या प्रकारानं शिवप्रेमी (ShivPremi) चांगलेच भडकले अजून याचा निषेध करण्यात येत आहे. अशातच आता याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) भडकले आहेत.

बंगळुरु येथे गुरुवारी रात्री महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला. यामुळे आता शिवभक्त चांगलेच तापले असून यावर मोर्चे काढले जात आहेत. यावर बोलताना आता संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

दोन दिवस आधी पंत प्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते, असं ट्विट करत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अशा घटनेचा धिक्कार असो. हिंदूंनो, आता उठा, जागे होण्याची वेळ आलीय, असंही राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या घटनेनं सध्या देशातील वातावरण चांगलंच तापलं असून याचे गंभीर पडसाद उमटताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…नाही तर राज्य अंधारात जाईल’; अशोक चव्हाण यांचा गंभीर इशारा

संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान, शिवप्रेमी आक्रमक

‘त्रास देणाऱ्या सरकारला चांगलाच धडा शिकवा’ म्हणत एसटी कर्मचाऱ्यानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

महागाईचा भडका: सीएनजी पीएनजी दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या नवे दर

‘लोकशाहीवर भाजपने धडे देण्याची गरज नाही’; अजित पवार कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More