बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! पुण्यात दिवसभर कुठंही फिरा तेही अवघ्या 40 रुपयात

पुणे | पुण्यात कुठंही फिरा तेही अवघ्या ४० रुपयात असं कुणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही,मात्र हे खरं आहे. पीएमपीएलमधून प्रवास करणं आता अधिक स्वस्त झालं आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे, तसेच ग्रामीण भागाचाही यामध्ये समावेश करण्यात आला असून याचे दरही जाहीर करण्यात आले आहे.

संपूर्ण पुणे महापालिका क्षेत्रात ४० रुपये, संपूर्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ४० रुपये तर दोन्ही महापालिका क्षेत्रात फिरण्यासाठी ५० रुपयांचा पास असणार आहे. तर दोन्ही पालिकांसह ग्रामीण भागात फिरण्यासाठी ७० रुपयांचा पास असणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचा प्रवास आता चांगलाच स्वस्त झाला आहे.

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी स्वारगेट येथील कार्यालयात पार पडली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर माई ढोरे, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी मनपा स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, तसेच पिंपरी मनपा आयुक्त राजेश पाटील उपस्थित होते.

पीएमपीचा दैनंदिन पास काढणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. नोकरदार तसेच सर्वसामान्य पुणेकरांना याचा मोठा फायदा होत असतो. याआधी या पासची किंमत ७० रुपये होती. तसेच मासिक पाससाठी १४०० रुपये द्यावे लागत होते. नव्या दरांनूसार मासिक पाससाठी आता ९०० रुपये द्यावे लागतील. ७ सप्टेंबरपासून नागरिकांना हे पास मिळण्यास सुरुवात होईल.

थोडक्यात बातम्या-

जगावेगळं काम! पुण्यातील नगरसेवकांनी कापडी पिशव्यांवर खर्च केले 11 कोटी

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

‘आम्ही त्याला माॅन्टी नावाने…’, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर मनसे नेत्याची भावुक पोस्ट

ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय?, नाना पटोले म्हणतात… ; पाहा व्हिडीओ

सिद्धार्थला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या शहनाजला पाहून तुम्हालाही येईल रडू; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More