Walmik Karad Custody l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आज वाल्मिक कराडला बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी एक धक्कादायक बाब उघडकीस आल्याने कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाल्मिक कराडच्या अडचणी वाढ :
खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. अशातच आता संतोष देशमुख हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका कराडवर ठेवला आहे. त्यामुळे आज बीड न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केल्यावर एसआयटीचे प्रमुख अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडचा संतोष देशमुख खून प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा न्यायालयाला दिला आहे.
कारण ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, अगदी त्याच दिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी फोनवरून बोलणे झाले असल्याचे समोर आले आहे.
Walmik Karad Custody l वाल्मिक कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी :
दरम्यान आता सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड यांचे बोलणे झाले असल्याचे कॉल रेकॉर्ड एसआयटीचे प्रमुख अनिल गुजर यांनी कोर्टात दिले, त्यानंतर पुढील तपासासाठी वाल्मिक कराडला बीड कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यासंदर्भात एसआयटी पथकाने तपासादरम्यान कॉल ट्रेस केले, यावेळी ही माहिती त्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यात नेमके काय बोलणे झाले याचा तपास अधिकारी अनिल गुजर हे करणार आहेत.
News Title : Walmik Karad 10 Days Police Custody
महत्वाच्या बातम्या-
वाल्मिक कराड हत्येच्या दिवशी आरोपींसोबत 10 मिनिटे बोलला! सगळं सत्य आलं समोर
वाल्मिक कराड मुंडेंकडे घरगडी म्हणून होता, मग एवढी संपत्ती कशी आली?
केज पोलीस ठाण्याबाहेर ब्लॅक गाडीच्या घिरट्या, नेमकं प्रकरण काय?
लाडक्या बहीणींनो ‘या’ दिवशी मिळणार जानेवारीचा हप्ता?, मोठी अपडेट समोर