‘…तर कायमची वाट लावेन, हात-पाय तोडेन’; चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडची धमकी?

Walmik Karad 2 crore ransom call recording

Walmik Karad | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड हा आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात कराड हा सध्या तुरुंगात आहे. अशात एका नव्या कॉल रेकॉर्डिंगने खळबळ उडाली आहे. कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याची एक रेकॉर्डिंग समोर आली आहे. (Walmik Karad)

या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाले आहे. आता हे रेकॉर्डिंग सीआयडीच्या सुद्धा हाती लागलं आहे त्यामुळे त्याची तपासणी केली जात आहे. 2 कोटींच्या खंडणीसाठी कराडने 29 नोव्हेंबर रोजी फोन केला होता. विष्णू चाटेच्या मोबाइलवरून हा कॉल करण्यात आला होता.

“…तर कायमची वाट लावून टाकेन”

त्यावेळी विष्णू चाटेने वाल्मिक (Walmik Karad) अण्णा बोलणार असल्याचे आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना सांगितले होते. वाल्मिक कराडने शिंदे यांना सुदर्शनने सांगितलं आहे त्याच स्थितीमध्ये काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय.

त्याचदिवशी सुदर्शन घुले आवादाच्या साईटवर पोहचला. काम बंद करा, नाहीतर तुमचे हातपाय तोडू. काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या असे त्याने सांगितले. याबाबतचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले.याचाच तपास आता सीआयडी करत आहे.त्यातील आवाज कराडचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कराडच्या वॉइस सॅम्पलची आणि त्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी केली जाणार आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

खंडणी प्रकरणात मोठा पुरावा हाती

आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सुनील शिंदे हे प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आहे. 29 नोव्हेंबर 2024 रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे याने फोन केला होता.तेव्हा वाल्मिक अण्णा (Walmik Karad) बोलणार असल्याचे शिंदे यांना सांगण्यात आले होते. या धमकीची रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागली असून त्याचा आता तपास केला जातोय.

News Title :  Walmik Karad 2 crore ransom call recording

महत्वाच्या बातम्या –

लग्नसराईत दागिने घ्यायचा विचार करताय?, पाहा लेटेस्ट 1 ते 10 ग्रॅम सोन्याचे दर

भयंकर! वर्षभराच्या बाळासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, नंतर मृतदेह गोणीत भरून…

आज पुत्रदा एकादशी, भगवान विष्णू ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांनी मौन सोडले!

पुण्यातील मगरपट्टा ते एफसी रोड, आकाची संपत्ती किती?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .